संत श्री लहरीबाबा जन्मोत्सव २०२४
जिल्हास्तरीय (५ जिल्हे) भजन स्पर्धा
महाराष्ट्राच्या समृद्ध अशा भजन परंपरेला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने आणि संत श्री लहरीबाबा जन्मोत्सव २०२४, निमित्त संत श्री लहरीबाबा आश्रम संस्थान (मध्यकाशी) कामठा , ता. जी. गोंदिया (महा.) या संस्थे तर्फे जिल्हा स्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या स्पर्धे मध्ये पाच जिल्हे गोंदिया, भंडारा, बालाघाट, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील भजन संघ सहभागी होऊ शकतात. भजनाने समाजाचे सांस्कृतिक पोषण आणि प्रबोधन केले आहे. हे ध्यानात घेऊन सदर आयोजनाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.
भजन स्पर्धा दि. ११/१२/२०२४ (बुधवार) ते १७/१२/२०२४(गुरूवार) पर्यंत (दोन दिवस) घेण्यात येईल.
श्री संत लहरीबाबा जन्मोत्सव २०२४ चा मुख्य कार्यक्रम दि. ११ ते १७ डिसेंबर ला संत श्री लहरी आश्रम कामठा (मध्य काशी), ता. जि. गोंदिया (महाराष्ट्र) येथे संपन्न होईल.
भजन स्पर्धेत सहभागी होण्याकरीता प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याचा फॉर्म भरण्या अगोदर सगळ्या सूचना, नियम व अटी व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे.
भजन स्पर्धे करीता नोंदणी करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२४ आहे. कृपया याची नोंद घ्यावी.