बाबांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्या भजनांच्या माध्यमाने, अभंगांच्या माध्यमाने समाजाला उपदेश केले. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा मध्ये गुरफटलेल्या समाजाला, भक्ती मार्ग चुकलेल्या लोकांना त्यांनी त्या अवस्थेतून आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून बाहेर काढले. शिव हा परमार्थात ज्ञान, वैराग्य व मोक्षाचे प्रतिक आहे तर विठ्ठल हा प्रपंचात भक्ती, सेवा व प्रेमाचे प्रतिक आहे. अशा प्रकारे लहरीबाबांच्या “प्रपंच परमार्थ एक सार” या संकल्पनेचे रूप म्हणजे मध्यकाशी कामठा.
पूजेत देव दुजा, श्रद्धेत देव माझा
धावुनी येतो काजा पंढरीचा तो राजा
हे शरीर अर्थात काया ही पंढरी तर आत्मा हा विठ्ठल. हे सर्वजन ऐकतात परंतु लहरीबाबा पुढे सांगतात – युगे अठ्ठावीस हे आमुचे ग्रंथ (४+६+१८) आहेत तर विवेक हा पुंडलिक आहे. शास्त्रापर्यंत हा विठ्ठल उभाच आहे. त्याची वीट म्हणजे भाव आहे. भीमा चंद्रभागा याच इडा पिंगला स्वर आहेत. कटेवरी हात म्हणजे प्रपंच-परमार्थाची सांगड आहे.
खरे तर वेदाची भाषा भेदाची आणि संताची भाषा अद्वैताची. संतांनी आत्मनुभावाचे ज्ञान जगाला दिले. हे आत्मज्ञान म्हणजेच पाचवा वेद होय असे संत लहारीबाबा म्हणतात. संत जिथे जन्माला येतात त्या परिसरात सुख शांती व ज्ञानाचा झरा वाहू लागतो. तिथे भ्रांती मिटते. मात्र “इथे भाव महत्वाचे जुडे नाते जीव शिवाचे” असे सांगतांना लहारीबाबा म्हणतात,
मानव पाहिजे निर्मळ मनाचा
तेंव्हा भेट देतो सखा पंढरीचा
तसेच..
''उर्ध्व दृष्टी उघडूनी पाहे तिथे तुझा तूच आहे .''
असे सांगत असताना, बाबा असेही म्हणतात -
''जैसे खाई अन्नः तैसे होई मन ! तैसे देई गुण नारायण ''
बाबा नेहमी समाजाला सत्येकडे नेतात, सामान्य व्यक्ति ला उपदेश करतांना बाबा म्हणतात कि....
कशाला करी स्नान भागीरथीत ।
कशाला उडी घाली गोदावरीत ।
मनो धूल रज तो धुवूनी निघावा ।
म्हणे दास जैराम सत्संग करावा ।
हे सांगत असताना पुढे म्हणतात -
नको जाऊ रे काशी विश्वे- श्वराशी ।
नको जाऊ रे सेतू रामे -श्वराशी ।
देव बुद्धीने तू जरी शोध करिशी ।
तुझा देव आहे पहा तुझपाशी । ।
विषयाचे सुख गोड वाटे मना !
पहा त्या रावणा काय झाले !!
सत्या सारिखे तप नसे !
खोट्या सारिखे पाप !
ज्यांचे अंतरी सत्य वसे !
त्यांचे अंतरी उमानाथ !
नजदीकी विमानतल : नागपुर विमानतल
रेल्वे लेन - नागपुर से रायपुर (गोंदिया स्टेशन)
कामठा ये जगह गोंदीया बालाघाट राज्य महा मार्गपर रावणवाड़ी गाव से १० कि मी के अंतर पर है.
![]() | श्री संत लहरी आश्रम कामठा (मध्य काशी), ता. जि. गोंदिया, महाराष्ट्र |
![]() | 91-07182-283024 |
![]() | secretary@santlaharinath.org |